श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

साधकांसाठी सूचना !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करता येतील.

gurupournima

१. मंदिरांत ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे

अ. सोमवार, मंगळवार आदी वारांच्‍या दिवशी त्‍या त्‍या देवतांच्‍या मंदिरात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे प्रदर्शन लावावे. या वेळी त्‍या देवतेची अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती देणारे फलकही लावता येतील. सोमवारी शिवाच्‍या मंदिरात पुष्‍कळ गर्दी असते. ठिकठिकाणच्‍या शिवमंदिरांत ग्रंथप्रदर्शन लावण्‍याचे नियोजन प्राधान्‍याने करावे.

आ. देवतांच्‍या नामपट्ट्या, चित्रे, ग्रंथ, लघुग्रंथ आणि पदक (लॉकेट) यांचे वेगवेगळे आकर्षक संच बनवून ग्रंथप्रदर्शनावर त्‍यांची विक्री करू शकतो.

इ. ग्रंथप्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंना ‘सनातन पंचांगा’चे महत्त्व सांगून वर्ष २०२४ च्‍या पंचांगाची मागणी घेता येईल.

२. सार्वजनिक ठिकाणी प्रवचनांचे आयोजन

मंदिरे, शाळा, महाविद्यालये, ज्‍येष्‍ठ नागरिक संघ, महिला मंडळे, निवासी संकुले आदी ठिकाणी ‘श्रावण मासाचे महत्त्व’ याविषयी, तसेच देवतांची अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती देणार्‍या प्रवचनांचे आयोजन करता येईल. ‘आदर्श गणेशोत्‍सव कसा साजरा करावा ?’, याविषयीही उपस्‍थितांना अवगत करता येईल.

३. विविध कार्यक्रमांमधून अध्‍यात्‍मप्रसार

अ. चातुर्मासाच्‍या निमित्ताने विविध मंदिरांत कीर्तन, प्रवचन आदींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्‍यात येते. अशा ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावता येईल, तसेच आयोजकांची अनुमती घेऊन ‘चातुर्मासाचे महत्त्व’ आदी विषयांवर प्रवचन घेता येईल.

आ. श्रावण मासात सुवासिनी मंगळागौरीच्‍या निमित्ताने एकत्र येतात. त्‍यांच्‍यासाठी प्रवचन, तसेच ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन करता येईल, तसेच तेथे येणार्‍या स्‍त्रियांना लघुग्रंथ किंवा सात्त्विक उत्‍पादने भेट म्‍हणून देता येतील.

इ. या मासात काही जण घरी पूजा करतात. या निमित्ताने धार्मिक कृतींचे शास्‍त्र सांगणारे ग्रंथ समाजापर्यंत पोचवता येतील.

४. घरोघरी जाऊन प्रसार

सण-उत्‍सव यांविषयीचे, तसेच विविध देवतांची माहिती देणारे ग्रंथ आणि लघुग्रंथ घरोघरी जाऊन वितरित करता येतील.

५. फलकप्रसिद्धी

श्रावण मासाविषयीची, तसेच देवतांच्‍या संदर्भातील माहिती सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लिहून फलकप्रसिद्धी करू शकतो.’ (९.८.२०२३)

रक्षाबंधनाच्‍या निमित्ताने ‘लव्‍ह जिहाद’ या ग्रंथाचे समाजात अधिकाधिक प्रमाणात वितरण करण्‍याचा प्रयत्न करा !

‘रक्षाबंधनाच्‍या निमित्ताने ‘लव्‍ह जिहाद’ या विषयाबद्दल मुली आणि स्‍त्रिया यांच्‍यात जागृती करण्‍याच्‍या दृष्‍टीने महिला संघटना अन् महिला मंडळे येथे या विषयावर प्रवचनांचे आयोजन करून ‘लव्‍ह जिहाद’ या ग्रंथाचे वितरण करू शकतो, तसेच हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना भेटून ‘ते या ग्रंथांचे वितरण करू शकतात का ?, अशी विचारणा करू शकतो. हे ग्रंथ प्रायोजित करून महाविद्यालये आणि महिला संघटना यांमध्‍ये विनामूल्‍य वितरित करू शकतो. रक्षाबंधनाच्‍या निमित्ताने भाऊ आपल्‍या बहिणीला भेटवस्‍तू म्‍हणून ‘लव्‍ह जिहाद’ हा ग्रंथ देऊ शकतो.’