राज्यातील ६० कारागृहांसाठी २ सहस्र पदांची निर्मिती होणार !
|
मुंबई – राज्यातील ६० कारागृहांतील बंदीवानांची संख्या ८ पटींनी वाढली आहे. ‘६ बंदीवानांमागेे किमान एक रक्षक’ असा नियम आहे; मात्र तो पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर नवीन २ सहस्र पदांची निर्मिती करून नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१. राज्यात ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा, एक किशोर सुधारालय, एक महिला, १९ खुली, एक खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. तेथे २५ सहस्र ३९३ बंदीवानांची क्षमता आहे; पण ४१ सहस्रांंपेक्षा अधिक बंदीवान आहेत.
२. त्या सर्वांवर लक्ष ठेवणे आणि कारागृह सेवेसाठी ५ सहस्र ६८ पदांची भरती करावी, अशी मागणी आहे; पण सध्या ४ सहस्र १९४ पदेच भरलेली आहेत. ही स्थिती वर्ष २००६ पासून तशीच आहे.
३. कांदिवलीच्या केईएस् विधी महाविद्यालयाच्या रुची कक्कड यांनी जुलै २०१९ मध्ये मुंबईतील कारागृहांना भेटी दिल्यावर अतिरिक्त बंदीवानांची संख्या अधिक असल्याची तक्रार त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली. आयोगाने पोलीस महासंचालकांना सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या वेळी हा विरोधाभास आढळून आला .
४. पावसाळी अधिवेशन काळात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ही नोकरभरती लवकरच करण्यात येईल.
संपादकीय भूमिका
|