(म्हणे) ‘काश्मिरी लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल !’
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी सैन्यप्रमुखांनी उठवले काश्मीरचे सूत्र !
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी लोकांना संबोधित करतांना पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे ७६ वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्याचप्रमाणे काश्मीरच्या लोकांनाही त्यांना कह्यात ठेवणार्या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल. पाकिस्तानच्या काकुल येथे मिलिटरी अकादमीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सैनिकांना संबोधित करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी पाकिस्तानला नष्ट करू शकेल. भारतावर आरोप करतांना पाकिस्तानी सैन्यप्रमुख म्हणाले की, आमचा प्रतिस्पर्धी राजकीय लाभ उठवण्यासाठी आमच्या विरोधात क्लृप्त्या लढवत आहे. मुनीर यांनी चीन हा पाकिस्तानचा खरा मित्र असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तानच्या जनतेने मात्र १४ ऑगस्टला ‘काळा दिवस’ पाळण्याचा निर्णय घेतला. बलुचिस्तानचे नागरिक १९४७-४८ पासून स्वत:ला पाकिस्तानचा भाग मानत नाहीत.
संपादकीय भूमिका
|