वसईत ई-सिगारेट जप्‍त

प्रतिकात्मक छायाचित्र

वसई – समतानगर परिसरातील ३ दुकानांत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्‍या पोलिसांनी धाड टाकली. यात परदेशी बनावटीच्‍या ई-सिगारेट जप्‍त केल्‍या. या प्रकरणी नबील खान, अहमद शेख अणि महंमद शेख यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला.