कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन, पोलीस यांना निवेदने !
‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !
कोल्हापूर – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये, प्रशासन आणि पोलीस यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले.
१. कोल्हापूर शहर येथे कोल्हापूर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी स्वीकारले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. विजय पाटील, शिवसेनेचे श्री. दुर्गेश लिंग्रस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप घाटगे, बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. अक्षय ओतारी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर उपस्थित होते.
२. हुपरी येथे नगरपालिकेत आणि हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. शांता-रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व परीसण्णा इंग्रोळे ज्युनिअर कॉलेज, जनता माध्यमिक विद्यालय, लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल, चंद्राबाई-शांताप्पा शेंडुरे कॉलेज येथे निवेदन देण्यात आले. सर्वच शाळा-महाविद्यालयांनी समितीचा उपक्रम योग्य असल्याचे सांगून ‘या संदर्भात राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना देऊ’, असे सांगितले.
या वेळी ‘लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थे’चे शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, छत्रपती शासन अध्यक्ष श्री. अभिनव गोंधळी, मनसे उपशहरप्रमुख श्री. ऋषिकेश साळी, सर्वश्री गणेश लोखंडे, वैभव माने, सतीश माळी, योगेश उगले, ओंकार रावळ, तेजस दळवी, ओंकार जांभळे, विजय मेथे, रवींद्र गायकवाड, संभाजी काटकर उपस्थित होते.
३. शिरोली येथे शिरोली ग्रामपंचायतीत सरपंच पद्मजा करपे यांना, तसेच आयडियल इंग्लीश स्कूल, शिरोली हायस्कूल शिरोली, राष्ट्रसेवा प्रशाला, कौतुक विद्यालय या शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याच्या उपक्रमात धर्मप्रेमी श्री. कृष्णात दिंडे यांचा पुढाकार होता.
४. याच समवेत वाठार येथेही निवेदन देण्यात आले.