आठवण तुमची फार येते देवा ।
१०.२.२०२३ या दिवशी नामजप करतांना गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण येत होती. तेव्हा त्यांच्याशी झालेला काव्यरूपी संवाद पुढे दिला आहे.
आठवण तुमची फार येते देवा ।
भेटणार पुन्हा सांगा मज केव्हा ॥ १ ॥
भेटीसाठी व्याकुळतेने करते मी धावा ।
दर्शनाचा क्षणमोती भेट मज द्यावा ॥ २ ॥
भावमोत्यांची सुंदर माला पहाते मी जेव्हा ।
हरपून जाते पहा भान माझे तेव्हा ॥ ३ ॥
हवास तू देवा, मजला हवास तू ।
‘आता केवळ देवच हवा. आणखी काही नको’, असे कधी-कधी वाटते, तेव्हा सुचलेल्या ओळी….
सोबतीला क्षणोक्षणी ।
हवास तू देवा, मजला हवास तू ॥ १ ॥
स्वभावदोष, अहं हे नकोत मजला ।
केवळ देवा, हवास तू ॥ २ ॥
मोह, माया त्यागून आले; कारण ।
हवास तू देवा, मजला हवास तू ॥ ३ ॥
विसावते जेव्हा तुझ्या चरणी मन ।
‘मनाला शांती केवळ श्रीगुरुच देऊ शकतात’, याची जाणीव झाल्यावर सुचलेल्या काव्यपंक्ती…
विसावते जेव्हा तुझ्या चरणी मन ।
हरवते ते स्वतःचेच भान ॥ १ ॥
विसावणे तुझिया चरणी ।
असे हे माझ्या शांतीचे कारण ॥ २ ॥
– सौ. स्वाती संदीप शिंदे, (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |