पालकांचे कर्तव्य
‘आजच्या धकाधकीच्या, भस्मासूरपणे वाढलेल्या महागाईच्या काळात आई-वडिलांना दोघांनाही नोकरी करावी लागते; पण त्या सर्व त्रासांतून वेळात वेळ काढून काही गोष्टी करणे पालकांच्याच हिताचे आहे; कारण ‘मुलांनी एकदा का वाईट संगत धरली की, त्याला सुधारण्याचे सामर्थ्य कुणालाही नाही’, असे म्हटले, तरी वावगे ठरू नये. एकदा मुले बिघडली की, म्हातारपणी आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात होईल. ‘आरंभीपासूनच पालकांनी आपल्या मुलांना चांगली संगत कशी मिळेल ?’, याचा कटाक्षाने विचार करणे’, त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे ?’, हे ध्यानात येईल.
१. पालकांनी चांगल्या विद्यार्थ्यांना काही निमित्त साधून वारंवार घरी बोलावून आपल्या मुलांना त्यांची संगत दृढ करण्यास साहाय्य केले पाहिजे.
२. पालकांनी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन शिक्षकांना अन् प्राध्यापकांना भेटून ‘आपली मुले शाळा-महाविद्यालयांत कशी वागतात ? आणि त्यांची अभ्यासात प्रगती कशी काय चाललेली आहे ?’, याची अधून-मधून विचारपूस केली पाहिजे.
आपले पालक अशा प्रकारे चौकशी करण्यास शाळा किंवा महाविद्यालयात येतात, हे पाहून मुले अनिष्ट मार्गाला जाण्यास धजावणार नाहीत.’
(साभार : मासिक ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’)