श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ! – महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्‍हापूर

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, कोल्हापूर

कोल्‍हापूर – श्री महालक्ष्मी मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. आगामी काही मासांत येणारे सण पहाता गर्दीमुळे पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे. मंदिरात कोणतीही संशयास्‍पद वस्‍तू आढळली, तर तातडीने अन्‍वेषण करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत, अशी माहिती कोल्‍हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.

महेंद्र पंडित पुढे म्‍हणाले, ‘‘एन्.आय.ए. (राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणा) स्‍वतंत्ररित्‍या काम करते. त्‍यांची कारवाई ही गोपनीयरित्‍या चालू असते. आवश्‍यक असेल, तरच ते अधिकारी स्‍थानिक पोलिसांचे साहाय्‍य घेतात. मिरज रेल्‍वे स्‍थानकाच्‍या सुरक्षेच्‍या दृष्‍टीने एक संशयास्‍पद दूरभाष आला होता. त्‍यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आम्‍ही कोल्‍हापूर रेल्‍वे स्‍थानकावर ‘मॉकड्रील’  (आभासी संकटातील कारवाईचे प्रत्‍यक्षिक) घेतले. कोल्‍हापूर येथे सध्‍या एकूण परिस्‍थिती पहाता ‘रॅपिड अ‍ॅक्‍शन फोर्स’ तैनात असून कोणतीही स्‍थिती हाताळण्‍यासाठी ती सक्षम आहे.’’