वृद्ध दांपत्याला बांधून चोरट्यांनी केली दागिन्यांची चोरी; महिलेचा मृत्यू !
मुंबईतील धक्कादायक प्रकार !
मुंबई – ताडदेव येथील मुख्य रस्त्यावरील युसूफ मंझील या इमारतीमधील सदनिकेमध्ये घुसून वृद्ध दांपत्याला बांधून ठेवून चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केली.
याप्रकरणी ताडदेव पोलीस आणि गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. तोंडाला चिकटपट्टी लावल्यामुळे, तसेच तोंडात कापसाच्या बोळे टाकल्यामुळे श्वास कोंडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा मदन अग्रवाल (७० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. ‘सीसीटीव्ही कॅमेर्यावरील फुटेजवरून या आरोपींचा शोध चालू आहे. ताडदेव पोलीस आणि गुन्हे शाखा यांकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला आहे.