औंध (पुणे) येथे टवाळखोराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
औंध (पुणे) – टवाळखोर तरुणाच्या त्रासामुळे अल्पवयीन शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंध भागात घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी हा मुलीचा काही मासांपासून पाठलाग करत होता. त्याने शाळकरी मुलीची छायाचित्रे समाजमाध्यमांत प्रसारित केली. त्यावर ‘माझी बायको’ असा संदेशही प्रसारित केला होता.