बीड जिल्ह्यातील १४३ धरणांमध्ये केवळ १३.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध !
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
बीड – मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दडी मारली असल्याने धरणातील पाणीसाठा न्यून झाला असून, अनेक जलसाठे कोरडे पडले आहेत. बीड जिल्ह्यातील १४३ धरणांमध्ये केवळ १३.३० टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिला आहे.
#Beed : पुढील आदेशापर्यंत पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश #Rain #WaterStoragehttps://t.co/KlFSHLSeZF
— ABP माझा (@abpmajhatv) August 15, 2023
यावर्षी पावसाचे प्रमाण न्यून असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच बीड जिल्ह्यात आतापर्यंत २४७.२ मिमी म्हणजेच ७६.६ टक्के पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. ‘त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ शकते’, असे यापूर्वीच सूचित करण्यात आले होते. तसेच विभागीय आयुक्तांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जलसाठ्यातील बेकायदेशीर पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या संदर्भात निर्देश दिले आहेत. पावसाळा चालू होऊन अडीच मास लोटूनही अद्याप बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही.