राजस्थानमध्ये संत मोहन दास यांची चाकूने भोसकून हत्या !
नागौर (राजस्थान) – येथील रसाळ गावात ७० वर्षीय संत मोहन दास यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह आश्रमाच्या फरशीवर पडला होता.त्यांचे हात-पाय दोरीने बांधले होते. तोंडावर आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. हरिराम बाबांच्या या आश्रमातील भैरोबाबा मंदिरात संत मोहन दास १४ वर्षांपासून सेवा करत होते. या हत्येच्या प्रकरणी संत मोहन दास यांच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘जोपर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे सांगितले.
राजस्थान में 70 साल के संत की चाकू मारकर हत्या, आश्रम के फर्श पर पड़ा था शव: रस्सी से बँधे थे हाथ-पैर, मुँह और आँखों पर थी पट्टी#Rajasthan https://t.co/R12Mcc1duB
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 14, 2023
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंचे संत-महंत यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद ! |