पाठ आणि कटी (कंबर) यांच्‍या वेदना असह्य झाल्‍यामुळे रात्री झोपेत अकस्‍मात मृत्‍यू झाल्‍यास ‘साधकाचे उर्वरित आयुष्‍य परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना मिळावे’, अशी प्रार्थना होणे

श्री. भूषण कुलकर्णी

‘मला पाठ आणि कटी यांच्‍या दुखण्‍याचा तीव्र त्रास असून तो त्रास जून २०२० पासून वाढला आहे. काही वेळा कटीमध्‍ये एवढ्या तीव्र वेदना होतात की, ‘मृत्‍यू आला, तरी चालेल; पण दुखणे नको’, असे मला वाटते. काही वेळा रात्री झोपतांना कटीचे दुखणे प्रचंड वाढल्‍यामुळे ‘सकाळी मी जिवंत असेन कि नाही’, याची मला शाश्‍वती नसते. त्‍यामुळे रात्री झोपतांना माझ्‍याकडून प्रार्थना होते की, ‘हे श्रीकृष्‍णा, आज दिवसभरात मला कटीच्‍या कळा सहन करण्‍याची आणि प्रारब्‍धभोग भोगण्‍याची शक्‍ती तूच दिलीस. मी आता झोपतो आहे; पण ‘सकाळी उठेन कि नाही’, याची मला शाश्‍वती नाही. मला झोपेत मृत्‍यू आला, तर माझे तू ठरवलेल्‍या आयुष्‍यापैकी जी काही वर्षे शेष राहिली असतील, ती परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना मिळू देत. त्‍यांना साधकांना मार्गदर्शन करण्‍यासाठी आणि ईश्‍वरी राज्‍य स्‍थापनेसाठी आयुष्‍याची आवश्‍यकता आहे.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०२१)