भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, होवोत सारे आनंदी ।
भारतीय स्वातंत्र्याची गत पंचाहत्तर वर्षे ।
रमले त्यात स्वार्थ साधूनी काँग्रेसभक्त सहर्षे ।। १ ।।
तीक्ष्ण वेदना सहन केल्या असंख्य देशभक्त क्रांतीवीरांनी ।
यश त्यातून हे लाभले प्रदीर्घ काळच्या तपश्चर्येने ।। २ ।।
स्वातंत्र्याचे सुराज्य करणे ही होती पुढील जबाबदारी ।
आतंकवाद अन् स्वैराचार मात्र पुढे फोफावला भारी ।। ३ ।।
‘त्राही भगवान’ म्हणण्याची वेळ नशिबी आली ।
चाणक्य अन् शिवरायांची सुजनांना आठवण झाली ।। ४ ।।
अद्यापही शेकडो वर्षांनी त्यांचे होते पुनश्च स्मरण ।
मृत न होते हिंदु संस्कृती अमर तिचे थोरपण ।। ५ ।।
तत्त्वनिष्ठ सात्त्विक संस्कृतीची दुर्दैवे नाही जाण कुणाला ।
मदोन्मत्त काँग्रेसी सत्तेने हिंदु संस्कृतीवर घाला घातला ।। ६ ।।
होत आहे उच्चाटन त्यांचे ज्यांनी हिंदूंचा अवमान केला ।
उत्सव हा अमृताचा होईल अमृताने पैजा जिंकिला ।। ७ ।।
हिंदुस्थानच्या हितशत्रूंचा नाश आता समीप आला ।
कारण हिंदु राष्ट्रासाठी परात्पर गुरूंचा संकल्प झाला ।। ८ ।।
आजचा अमृत महोत्सव हा भावी हिंदु राष्ट्राची नांदी ।
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, होवोत सारे आनंदी ।। ९ ।।
– श्री. द.र. पटवर्धन (वय ६९ वर्षे), कोलगांव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.७.२०२२)