…तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे !
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र आणि सुखासीन जीवनावर निखारा ठेवलेल्या क्रांतीविरांमुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. पाकिस्तान आणि चीन यांनी कपटीपणाने केलेल्या आक्रमणांच्या वेळी अत्याधुनिक युद्धसाहित्य, पुरेशी रसद इत्यादी नसतांनाही केवळ देशनिष्ठेच्या बळावर शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजलेल्या भारतीय जवानांमुळेच आज आपला देश टिकून आहे. या सार्या विरांप्रती कृतज्ञताभावापोटी आपल्या डोळ्यांत आसवे जमा होत असतील, शत्रूराष्ट्रांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा आपण निर्धार केला असेल, समाजकंटक अन् राष्ट्रद्रोही यांच्याशी लढण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेण्याचा दृढ निश्चय आपण केला असेल, कुटुंबातील एका तरी मुलाला सैन्यदलात पाठवण्याचा संकल्प आपण केला असेल आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’सारख्या संघटनांच्या कार्यात प्रतिदिन किमान १ घंटा देण्याची आपल्या मनाची सिद्धता झाली असेल, तर आणि तरच आपल्याला ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्याचा अधिकार आहे, असे समजा ! अन्यथा आपण या देशात रहाण्यास पात्र नाही, असे समजा !!’
– (पू.) संदीप आळशी