झोपेचे सोंग घेऊन पतीकडून पत्नीचे शेजारच्या युवकाशी असलेले अनैतिक संबंध उघड !
अमरावती येथील घटना !
अमरावती – पत्नीचे शेजारी रहाणार्या २० वर्षीय युवकासमवेत असलेले अनैतिक संबंध असल्याचे उघड करण्यासाठी पतीने झोपेचे सोंग घेतले. त्यानंतर अनैतिक संबंध उघड झाले. ती सतत भ्रमणभाषवरून युवकासमवेत व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या माध्यमातून संपर्कात होती. ती रात्री कुणाला तरी भेटायला जाते, असा संशय आल्याने पतीने झोपण्याचे नाटक केले. पत्नी हळूच घराबाहेर पडली. घराच्या दरवाजाची बाहेरची कडी तिने लावून घेतली; पण पतीने तारेच्या साहाय्याने कडी उघडली. त्याने शेजारच्या खोलीत जाऊन पाहिल्यावर पत्नी युवकासमवेत दिसली. पतीला समोर पाहिल्याने ती घाबरली, तर युवकाने पतीला धक्काबुक्की करत तो पळून गेला. पतीने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.