(म्हणे) ‘आपण आपली भूमी चीनला गिळंकृत करू दिली !’-असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यानी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप करतांना केले दायित्वशून्य विधान
नवी देहली – लडाखमध्ये आजही चिनी सैन्य तैनात आहे; परंतु आपले सैन्य तेथे नाही. त्यामुळे चीनला आपण आपली भूमी गिळंकृत करू देत आहोत. भारताने यावर मौन बाळगले आहे. आपण नेमके काय लपवत आहोत ? भारताच्या अशा भूमिकेमागे पंतप्रधान मोदी यांची चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी असलेली मैत्री कारणीभूत आहे का ?, असे दायित्वशून्य विधान एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. ते पुढे म्हणाले की, भारत-चीन सीमेवरील लडाखच्या २५ स्थानांवर भारतीय सैन्य जाऊ शकत नाही, असे सैन्याने आधीच घोषित केले आहे. (अशा प्रकारे वक्तव्य करून ओवैसी यांना नेमके काय सांगायचे आहे ? – संपादक)
#SabkaHisabHoga : असदुद्दीन ओवैसी को भारतीय सेना पर भरोसा क्यों नहीं? इस पर क्या बोले रक्षा विशेषज्ञ कर्नल (रि.) टी.पी त्यागी?
Watch live TV: https://t.co/iEvJbAlLD7#IndianArmy #AsaduddinOwaisi #AbIndiaDaily@pratyushkkhare @GeneralKKSinha pic.twitter.com/YzF5rMBFsn
— India Daily Live (@IndiaDLive) August 14, 2023
संपादकीय भूमिकाभारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात, हे ओवैसी यांच्या कसे लक्षात येत नाही ? |