रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये निवेदने
विद्यार्थ्यांकडून अनावधानानेही राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे !
रत्नागिरी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असतांना हातातील राष्ट्रध्वज भूमीवर पडू नये, यासाठी लाठ्या खाल्ल्या, प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना मुलांना खेळण्यासाठी घेतलेले, वाहनांवर लावलेले कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे नंतर रस्त्यावर पडलेले पहायला मिळतात. राष्ट्रध्वजासाठी बलीदान करणार्या क्रांतीकारकांचा हा एक प्रकारे अवमानच आहे. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वतःचा चेहरा आणि शरीर रंगवतात, तसेच त्याच्या रंगातील कपडे घालतात. यांमुळेही राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे विद्यार्थ्यांच्या मनावर आताच बिंबवायला हवे. अनावधानेही राष्ट्रध्वजाचा अवमान तथा विटंबना विद्यार्थ्यांकडून होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथील शाळा अन् महाविद्यालये यांमध्ये देण्यात आले.
रत्नागिरी
येथे अ.के. देसाई हायस्कूल, रत्नागिरीचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद शेखर यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.
तसेच येथील आर्.बी. शिर्के हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल आणि फाटक हायस्कूल येथेही निवेदने देण्यात आली. फाटक हायस्कूल येथे ‘क्रांतीगाथा प्रदर्शन’ लावण्याची अनुमती देण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. रमण पाध्ये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्ताराम घडशी, श्री. चंद्रशेखर गुडेकर आणि श्री. अशोक पाटील उपस्थित होते.
चिपळूण
येथे न्यू इंग्लिश स्कूल, करंबवणेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्रकुमार ओंबासे; प्रगती माध्यमिक विद्यालय, मालदोली-बिवली-गांग्रई येथे साहाय्यक शिक्षक श्री. ए.एस्. अस्वले, श्री. एस्.एस्. गुरव; जिल्हा परिषद मराठी शाळा, बिवली येथे शिक्षिका सौ. कल्पना दिलवाले; कालूस्ते येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जालिंदर कवितके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हायस्कूलचे स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री. शशिकांत घागही उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. जालिंदर कवितके यांनी इयत्ता १० वीच्या वर्गात ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी माहिती देण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
बिवली येथील जि.प. मराठी शाळेत समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी राष्ट्रध्वजाविषयी माहिती सांगितली.
पेढांबे नं. १ या शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खान, शिक्षिका सौ. जाधव; अलोरे हायस्कूल, अलोरेचे उपप्राचार्य सौ. गमरे आणि शिक्षक श्री. लांजेकर; मंदार एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दयानंद रांजणे यांनाही निवेदने देण्यात आली.
सर्व निवेदने देते वेळी धर्मप्रेमी श्री. मंदार केतकर, श्री. रामचंद्र शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक सुर्वे, श्री. जयवंत शिंदे आणि श्री. सुरेश शिंदे उपस्थित होते.
दापोली
ए.जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सतीश जोशी, दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य श्री. संदेश जगदाळे, श्री रामराजे कॉलेजचे प्राध्यापक श्री. कुणाल मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. राकेश गुरव, श्री. काशिनाथ भांबिड, सनातन संस्थेचे श्री. शरद पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवींद्र कोळेकर आणि श्री. दर्शन मोरे उपस्थित होते.
तालुक्यातील हर्णे येथे एन्.डी. गोळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत गुरव, श्रीराम हायस्कूल, पाजपंढरीचे मुख्याध्यापक यांनाही निवेदने देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. चिन्मय गुरव आणि समितीचे श्री. महेश लाड हे उपस्थित होते.