गुटख्याची तस्करी करणार्या धर्मांधाला ठाणे येथून अटक !
ठाणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधित तंबाखू, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणारा आरीफ जफर शेख (वय २२ वर्षे) याला राबोडी पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून अटक केली. त्याच्याकडून गुटख्यासह ८२ सहस्र ६६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (कठोर शिक्षेअभावी धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, हे सरकारने लक्षात घ्यावे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :गुटखाबंदी असतांना त्याच्याशी संबंधित पदार्थ राज्यात येतातच कसे ? यामागील यंत्रणेचाही शोध घ्यायला हवा ! |