विमाननगर (पुणे) येथे ३ गायींची कत्तलीपासून सुटका !
पुणे – गायींच्या कत्तलीसाठी विमाननगर मार्गावरून टेंपो जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार मंगेश चिमकर, शादाब मुलाणी, ओंकार जाधव, प्रेम पवार आणि निखिल दरेकर यांनी सकाळी ७ वाजता विमाननगर चौकात टेंपो पकडला. टेंपोची पडताळणी केली असता त्यात एक देशी खिल्लार जातीची गाय आणि २ जर्सी गायी बांधलेल्या आढळल्या. त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. वाहनचालकास गायींविषयी विचारणा केली असता या गायी ‘कँप’ येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.