सूज आणि ठणका यांवर उपयुक्‍त एरंडेल तेल

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२६

‘काही वेळा काटा लागल्‍यावर त्‍या भागाला सूज येते आणि तेथे ठणकू लागते. गळू किंवा केसतोड झालेला असतांनाही सूज आणि ठणका असतो. अशी सूज आणि ठणका असतांना एरंडेल तेल पुष्‍कळ चांगले काम करते. दिवसातून २ वेळा दुखणार्‍या भागावर एरंडेल लावावे. ठणका जास्‍त असल्‍यास एरंडेल लावलेल्‍या भागी एखादे पान (उदा. केळीचे पान) ठेवून वरून हींटिंग पॅड किंवा गरम वाळूच्‍या पोटलीने ५ ते १० मिनिटे शेक द्यावा. या उपचाराने १ – २ दिवसांत सूज आणि ठणका न्‍यून होतो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३)

(लवकरच या लेखांवर आधारित ग्रंथ प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका

bit.ly/ayusanatan