कामातील वास्तूदोष दूर होण्यासाठी माजी नगरसेवकाकडून बोकडबळी !
|
नाशिक – येथील राजे संभाजी स्टेडियमचे काम ३ वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. काम करणार्या २ ठेकेदारांचा मृत्यू झाला आहे. तिसरा ठेकेदारही काम करण्यास असमर्थ ठरल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे आणि त्यांचे पती बाळा दराडे यांनी वास्तूदोष असल्याचे सांगत वास्तूपूजा करून या ठिकाणी बोकडबळी दिला; मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचा कांगावा करून निषेध व्यक्त केला आहे.
केंद्रशासनाच्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत ६ कोटी रुपये व्यय करून भव्य क्रीडांगण आणि इतर सुविधा यांसाठी स्टेडियममध्ये कामे करण्यात येत होती; परंतु अनेक अडथळ्यांमुळे ती पूर्ण झाली नाहीत. या स्टेडियमचे आतापर्यंत दीड कोटी रुपयांचे काम झाले असून पुढील काम थांबवण्यात आले आहे. महापालिकेने आणखी ३ कोटी रुपयांचा निधी या कामासाठी संमत केला आहे. त्यामुळे ९ कोटी रुपये व्यय करून ही कामे होणार आहेत. या ठिकाणी म्हसोबा महाराजांचा प्रसाद म्हणून बोकडबळी देण्यात आला, तसेच परिसरातील नागरिकांना जेवण देण्यात आले.
Nashik News : संभाजी स्टेडियमचे काम पूर्ण होण्यासाठी नगरसेविकेने दिला बोकड बळी https://t.co/MAXdxcLI9B #Nashik #nasik #NewNashik #Goat #SambhajiStadium #RajeSambhajiStadium
— Deshdoot (@deshdoot) August 13, 2023
संपादकीय भूमिकाईदच्या दिवशी बोकडाची कुर्बानी दिली जाते, त्या वेळी मुसलमानांना जाब विचारण्याचे धाडस अंधश्रद्धा निर्मूलन समिती का दाखवत नाहीत ? |