कॅनडात श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !
|
ओटावा – कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील हे सर्वांत जुने आणि सर्वांत मोठे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेण्याविषयी फलक लावण्यात आले असून, त्यावर खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर हा सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबचा प्रमुख होता. गुरुद्वाराच्या आवारात १८ जून या दिवशी २ अज्ञात बंदूकधार्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
कनाडा में भारतीय मंदिरों को एक बार फिर निशाना बनाया गया है! #Canada
https://t.co/tvOdgqTCq9— AajTak (@aajtak) August 13, 2023
हिंदु मंदिरावरील आक्रमणाची या वर्षातील तिसरी घटना !
कॅनडात हिंदु मंदिरांवर आक्रमणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षी हिंदु मंदिरावरील आक्रमणाची ही तिसरी घटना आहे.यापूर्वी ३१ जानेवारी या दिवशी कॅनडातील ब्रॅम्प्टन भाागातील एका प्रसिद्ध हिंदु मंदिरावर आक्रमण करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. यानंतर एप्रिलमध्ये कॅनडातील आेंटारियो येथे एका हिंदु मंदिरावर आक्रमण झाले होते. खलिस्तानी समर्थकांनी हे आक्रमण केल्याचा आरोप होता. कॅनडातील भारतीय दूतावासाने यावर आक्षेप घेतला होता.
संपादकीय भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे खलिस्तान्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ते कॅनडातील वाढत्या हिंदुविरोधी आणि खलिस्तानवादी कारवाया रोखतील, याची अपेक्षाच नको. आता हे रोखण्यासाठी भारताचे धडक कारवाई करणे आवश्यक ! |