विवाहित सिराजने गौतम बनून आदिवासी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार !
गुजरातच्या भरूचमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण !
भारूच (गुजरात) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले असून ३ मुलांचा विवाहित पिता सिराज रुस्तम खानने एका आदिवासी मुलीला स्वत:चे नाव ‘गौतम’ असल्याचे सांगितले. इन्स्टाग्रामवर त्याने स्वत:ची ओळख त्या नावाने केली होती. पुढे त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावू लागला. या कालावधीत त्याने तिच्याकडून ७० सहस्र रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सौजन्य: TIMES NOW Navbharat
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या विरोधात आता राष्ट्रव्यापी कायदा होणार आहे. तसा तो गुजरात राज्यात आधीपासून आहेच, तरीही धर्मांध मुसलमानांना त्याचे काही भय नाही. त्यामुळे मुळात हिंदु मुलींनी अशा धर्मांधांच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी त्यांनी साधनेची कास धरणे आवश्यक ! |