अकोला येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम !

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. गिरीश कुलकर्णी

अकोला – महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात घेण्यात आला. यात ६०० विद्यार्थिनी आणि शिक्षक या वेळी उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. रसिका वाजगे होत्या. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन, भारतमाता पूजन यांनी झाला. देशभक्तीपर गीत, क्रांतीकारकांचे बलीदान यांवर उद्बोधन आदी कार्यक्रम पार पडले.

शेवटी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने श्री. गिरीश कुलकर्णी यांनी ‘भारतीय संस्कृतीचे रक्षण म्हणजेच राष्ट्ररक्षण कसे ?’ हे विविध प्रकारची उदाहरणे देऊन समजावून सांगितले. यात वाढदिवस तिथीनुसार आणि औक्षण करून साजरा करणे, विविध ‘डे’ साजरे न करणे, नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करणे, ‘हॅलो’ऐवजी नमस्कार म्हणणे, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आदींविषयी प्रबोधन करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय संस्कृती पालन करण्याचे आश्‍वासन दिले. शेवटी प्रार्थनागीत झाले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. रसिका वाजगे यांनी ‘‘कार्यक्रम पुष्कळ चांगला आणि प्रबोधनपर झाला, असे प्रबोधन वारंवार होणे आवश्यक आहे’, असे सांगितले.