भावी भीषण आपत्काळाचा धोका ओळखून कुटुंबासाठी लागणार्या वस्तू आताच खरेदी करून ठेवा !
‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ, अमेरिका अन् युरोप खंडांतील जंगलांना लागलेल्या भीषण आगी इत्यादी घटनाही आपल्या डोळ्यांसमोर आहेतच. अनेक संतमहात्मे, भविष्यवेत्ते आदींनी ‘येणारा आपत्काळ पुष्कळ भीषण असणार आहे’, असे वेळोवेळी म्हटलेलेच आहे. बर्याचदा समष्टी प्रारब्ध, सूक्ष्म जगतातील वाईट शक्तींचे पालटणारे डावपेच, कालचक्र इत्यादींमुळे आपत्काळाचा अवधी पुढे-मागे होत असला, तरी आपत्काळाला तोंड देण्यासाठी सर्वांनी नेहमीच सिद्ध असायला हवे. आपत्काळात अन्नधान्य, पाणी, औषधे, इंधन आदी वेळेवर उपलब्ध होणे कठीण होते. आपत्काळात कुटुंबासाठी लागणार्या नित्योपयोगी वस्तूंचा, तसेच वेळप्रसंगी लागणार्या वस्तूंचाही तुटवडा भासतो. आपत्काळाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वस्तूंची खरेदी करणे सोपे जावे, या हेतूने पुढे विविध वस्तूंची सूची दिली आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वयोमान आणि घरातील खोल्यांची संख्या यांनुसार त्यांतील आवश्यक त्या वस्तू योग्य प्रमाणात खरेदी करून ठेवाव्यात. पुढील वस्तूंव्यतिरिक्त काही वेगळ्या वस्तू सुचल्या, तर त्याही खरेदी कराव्यात.
१. नेहमी लागणार्या वस्तू
दंतमंजन, दाढीचे साहित्य (सामान), केशकर्तनाचे साहित्य, अंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण, कपडे, केसांना लावायचे तेल, कुंकू, आरसा, फणी, कंगवा, ‘नेल कटर’ (नखे कापणारे उपकरण), उपनेत्र म्हणजे चष्मा (नेहमीच्या वापरातील चष्मा फुटू शकतो.), इस्त्री (शक्यतो कोळशावर चालणारी), अंथरूण-पांघरूण, केरसुणी, प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, लेखणी (पेन आणि पेन्सिल), पादत्राणे इत्यादी
२. स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू
पक्कड, चिमटा (वापरात असलेली पक्कड किंवा चिमटा मोडू शकतो.), खलबत्ता, विळीला धार लावण्याचा दगड इत्यादी
३. ऋतूंनुसार लागणार्या वस्तू
३ अ. उन्हाळ्यात लागणार्या वस्तू : वारा घेण्यासाठी हातपंखा, काळा चष्मा (गॉगल), उन्हात फिरतांना चेहरा आणि मान झाकण्यासाठी बांधायचा मोठा रुमाल (स्कार्फ), टोपी इत्यादी
३ आ. पावसाळ्यात लागणार्या वस्तू : छत्री, ‘रेनकोट’, पावसाळी पादत्राणे इत्यादी
३ इ. हिवाळ्यात लागणार्या वस्तू : ‘स्वेटर’, हातमोजे, पायमोजे, कानटोपी, शाल, मफलर, कांबळे (ब्लँकेट) इत्यादी
४. घरात हव्यात, अशा वस्तू
४ अ. घरातील लहान दुरुस्त्यांसाठी उपयुक्त वस्तू : टेकस (लहान चुका, चामड्याच्या चपलेचा अंगठा तुटला, तर तो लावण्यासाठी टेकस वापरतात.), चुका (छोटे खिळे), खिळे, हातोडी, पान्हे, पक्कड, ‘स्क्रू ड्रायव्हर’, ‘कटर’, लहान फळी कापण्यासाठी करवत, फळीची कडा घासण्यासाठी ‘पॉलीश पेपर’, कात्री, ‘मापन फीत (मेझरिंग टेप)’ इत्यादी
४ आ. शिवणकामाच्या वस्तू : सुई-दोरा, बटणे, कात्री, मापन फीत (कापड मोजण्यासाठी ‘मेझरिंग टेप’), शिवण यंत्र इत्यादी
४ इ. उपद्रवी प्राण्यांना प्रतिबंध करणार्या वस्तू : डास, उंदीर, ढेकूण, मुंग्या, उवा, लिखा (उवांची अंडी) इत्यादींना प्रतिबंध करणारी औषधे; उंदीर पकडायचा पिंजरा, मच्छरदाणी इत्यादी
४ ई. घरात अतिरिक्त असाव्यात, अशा वस्तू : अंघोळीची बालदी आणि पाणी अंगावर घेण्यासाठीचा ‘मग’, कपडे भिजवण्यासाठीची बालदी, कपडे धुण्याचा ‘ब्रश’, विजेशी संबंधित वस्तू (विद्युत् दिवे, दंडदीप (ट्यूब्स), विजेची जोडणी करणारी ‘थ्रीपिन’ (भिंतीवर असलेल्या विद्युत् कळफलकात, म्हणजे ‘स्वीच बोर्डा’त इस्त्रीसाठी किंवा अन्य कारणासाठी तीन भोके असलेले एक स्थान ठेवलेले असते. तेथे ‘थ्रीपिन’ घालतात. तेथून नवीन ठिकाणी विद्युत्प्रवाह नेता येतो.) अन् ‘होल्डर’ (यात विद्युत् दिवा, म्हणजे ‘बल्ब’ घातला जातो.), पायांत घालायच्या ‘स्लीपर’चे पट्टे इत्यादी
४ उ. अन्य वस्तू : आकाशवाणीवरून देण्यात येणार्या शासकीय सूचना ऐकण्यासाठी लहान रेडिओ (ट्रान्झिस्टर) किंवा रेडिओ, किल्लीवर चालणारे घड्याळ, उत्पादनाच्या दिनांकापासून पुढे अनेक वर्षे चालणारे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) हातावरचे घड्याळ (अशी हातावरची घड्याळे ५० वर्षेही चांगली चालतात. हाताच्या हालचालीमुळे ती चालतात. हातावरून काढून ठेवल्यास साधारण ३ दिवस चालतात.), सौरऊर्जेवर चालणारे घड्याळ, भ्रमणभाष प्रभारित करण्यासाठी ‘पोर्टेबल सोलर चार्जर’, ‘गॅस लायटर’, वार्याने ज्योत न विझणारा ‘लायटर’ (विंडप्रूफ लायटर), मेणबत्ती, सुतळ, सुंभ, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, सायकलमध्ये हवा भरण्याचा ‘पंप’, वीजप्रवाह तपासण्यासाठी ‘टेस्टर’ इत्यादी
५. रुग्णांसाठी उपयुक्त वस्तू
तापमापक (थर्मोमीटर), अंग शेकण्यासाठी गरम पाण्याची रबरी पिशवी, आयुर्वेदाच्या गोळ्यांचे चूर्ण करण्यासाठी लहान खलबत्ता, ‘कमोड’ची खुर्ची, डायपर (मल-मूत्र शोषून घेणारे वस्त्र) इत्यादी
‘येणार्या आपत्काळात स्वतःला उपयुक्त ठरतील, अशा वस्तू संग्रही ठेवायला हव्यात’, हे प्राण्यांना कळत नाही. आपण मनुष्य आहोत, तर त्याचा लाभ घेऊया.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.८.२०२३)
आपत्काळाच्या अनुषंगाने करायच्या एकूणच पूर्वसिद्धतेविषयी मार्गदर्शन करणारी ‘आपत्काळातील जीवितरक्षण (२ खंड)’ ही ग्रंथमालिका सनातनने प्रकाशित केली आहे, तसेच Survival Guide या नावाचे ‘अॅन्ड्राईड अॅप’ही सनातनने विनामूल्य उपलब्ध केले आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘आपत्काळातील जीवितरक्षण’ ही ग्रंथमालिका www.sanatanshop.com वर उपलब्ध आहे. स्थानिक सं.क्र. : (०८३२) २३१२६६४ |