सहाव्या आरोपीला अटक, सहाही आरोपी धर्मांध !
पुणे – ‘एन्.आय.ए.’ने ‘पुणे इसिस मॉड्यूल’ प्रकरणात ११ ऑगस्ट या दिवशी शमील साकिब नाचन याला अटक केली आहे. आरोपी हा आतंकवादी कृत्यांसाठी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस’च्या (‘आय.ई.डी.’च्या) बनावट, प्रशिक्षण आणि चाचणी यांमध्ये गुंतलेला असल्याचे आढळले आहे. आतंकवादी संघटनेच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रीय सहभाग असल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात ‘एन्.आय.ए.’ने केलेली ही सहावी अटक आहे. आरोपी हा साकिब नाचनचा मुलगा आहे. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील रहिवासी आहे. आरोपी हा शमील जुल्फिकार अली बडोदावाला, महंमद इम्रान खान, महंमद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयित यांसह इतर ५ आरोपींच्या सहकार्याने काम करत होता. भारतात आतंकवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या आतंकवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एन्.आय.ए. व्यापक अन्वेषण करत आहे.
पुण्यातील कोंढवा येथील घरातून आतंकवादी कार्यरत !
शमीलसह ‘इसिस स्लीपर मॉड्यूल’चे हे सदस्य कोंढवा येथील घरातून कार्यरत होते, जिथे त्यांनी आयईडी एकत्र केले होते आणि गेल्या वर्षी बाँब प्रशिक्षण अन् कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात भाग घेतला होता. त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी या ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता.
‘पुणे इसिस मॉड्यूल’ प्रकरण
देशात सर्वत्र स्लिपर सेल बनवण्यात इसिस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. देशाच्या सुरक्षिततेशी अत्यंत गंभीर असलेल्या या गोष्टी केंद्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेऊन इसिसचा बीमोड करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत अटक केलेले सर्व आतंकवादी धर्मांध असणे, हे ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करते. |