१४ ऑगस्ट : भारतासाठी एक काळाकुट्ट दिवस !

उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…

१४ ऑगस्ट १९४७ हा भारताच्या अर्वाचीन इतिहासातील काळाकुट्ट दिवस ! हिंदूंनी अंतर्मुख होण्याचा दिवस ! जगात मुसलमानांचे ५७ देश आहेत. ‘५८ वा मुसलमान देश’, अशी भारताची नोंद व्हायला नको असेल, तर १४ ऑगस्ट या दिवशी अखंड हिंदु राष्ट्राला झालेली जखम उघडी करून, आतापर्यंत त्यावर केलेली वरवरची मलमपट्टी थांबवून ‘शस्त्र’कर्मच केले पाहिजे; नाही तर ही जखम भळभळत वहातच रहाणार ! पाकिस्तान आणि त्याच्या पाठबळावर भारतातील धर्मांध मुसलमान यांनी निर्माण केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी १४ ऑगस्टपेक्षा चांगला मुहूर्त कोणता असणार ?

बरोबर ७६ वर्षांपूर्वी, म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री ‘पाकिस्तान’ नावाचे ‘सैतानी राष्ट्र’ या भूतलावर निर्माण झाले. त्या १४ ऑगस्टची आठवण आपण ठेवली नाही, तर परवाचा १५ ऑगस्ट (भारताचा स्वातंत्र्यदिन) साजरा करण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही. ‘स्वतंत्र होण्याआधीच हिंदु राष्ट्राच्या पायात कायमच धुमसत राहील’, असा एक ज्वालामुखी याच दिवशी निर्माण केला गेला. देशाला नित्याची डोकेदुखी ठरेल, अशी व्यवस्था नव-भारताच्या जन्मापूर्वी काँग्रेसने करून ठेवली !

संकलक : श्री. संजय दि. मुळ्ये, रत्नागिरी

श्री. संजय मुळ्‍ये

१. फाळणी विसरणारेे आणि हिरोशिमा (जपान) लक्षात ठेवणारे भारतीय !

‘वायव्य सीमा प्रांत, सिंध, पंजाब आणि पूर्व बंगाल या प्रांतांतील लक्षावधी हिंदूंचे संसार ५ – ६ मासांच्या कालावधीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यांची घरेदारे, मालमत्ता लुटली गेली, अनेकांच्या आया-बहिणींची अबू्र् धर्मांध गुंडांनी लुटली, अनेकींचे अपहरण झाले, लक्षावधी हिंदूंची कत्तल झाली आणि उरलेल्या सर्वांना प्राणरक्षणासाठी, सध्या ज्याला ‘भारत’ म्हणतात, त्या प्रदेशाकडे धाव घ्यावी लागली. नादीरशाहने भारतात क्रूर कत्तलींचा उच्चांक गाठला होता; तथापि तेव्हाही एवढ्या विस्तृत क्षेत्रात हिंदूंच्या कत्तली झाल्या नव्हत्या. फाळणीच्या वेळी झालेल्या अनन्वित अत्याचारांनी नादीरशाहलाही लाजवले !

हिरोशिमावर एक अणूबाँब पडला आणि लक्ष-दोन लक्ष माणसे मरण पावली. भारताची फाळणी त्यानंतर झाली. या वेळी हिरोशिमाच्या कितीतरी पट अधिक माणसे मृत्यूमुखी पडली. हिरोशिमात बायकामुलींची ना विटंबना झाली, ना त्यांचे अपहरण झाले. फाळणीच्या वेळी मात्र लक्षावधी लोकांना मुसलमान गुंडांच्या भीतीने भर पावसाळ्यात जंगलामधून, आडवाटांनी, अन्नपाण्याविना मैलोगणती प्रदेश तुडवत भारतात यावे लागले. पायी चालत येणार्‍या निर्वासितांच्या तांड्यांवर सशस्त्र टोळ्यांची आक्रमणे झाली. एक रेल्वे पाकिस्तानातून भारतात आली ती केवळ हिंदूंची प्रेते घेऊन !’ (साभार : ‘नाही चिरा, नाही पणती !’, या फाळणीवरील आधारित पुस्तकाच्या श्री. दि.वि. गोखले यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून)

२. लोकसंख्येची अदलाबदल न करण्याची चूक !

धार्मिक पायावर देशाची फाळणी झाली. काँग्रेसने त्याला ‘स्वयंनिर्णय’ असे गोंडस नाव दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी उघडपणे मागणी केली होती की, फाळणी धार्मिक पायावर होत आहे, त्यामुळे लोकसंख्येची अदलाबदल करण्यात यावी. भारतातील सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवण्यात यावे; पण या दोघांच्या मागणीला गांधी-नेहरूंनी पाने पुसली आणि आपल्या पश्‍चात ‘प्रत्येक ७० – ८० वर्षांनी भारतात फाळणीसदृश्य परिस्थिती निर्माण होईल’, अशी व्यवस्था करून ठेवली ! हिंदु-मुसलमानांच्या अदलाबदलीची प्रक्रिया त्याच वेळी पूर्ण केली असती, तर दाऊद इब्राहिम पाकिस्तानात जन्माला आला असता आणि त्याने शुक्रवार, १२ मार्च १९९३ या दिवशी मुंबईत केलेल्या बाँबस्फोटांत जे शेकडो हिंदू मेले, ते वाचले असते. आज प्रत्येक राज्यात असे अनेक दाऊद संधीची वाट पहात आहेत !  पाकिस्तानचे त्यांना साहाय्य आहे !!

पाकिस्तान नावाचे हे लोढणे आपणच आपल्या गळ्यात बांधून घेतले आहे. हे दूर केल्यावाचून आपले सैन्य, काश्मिरी हिंदू आणि देशप्रेमी नागरिक सुखाने झोपू शकणार नाहीत. काही वर्षांपूर्वी काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी असतांना मियां फारूख अब्दुल्ला म्हणाले होते, ‘‘जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद थांबणार नाही.’’ हे धर्मांध राजकारणी कधीतरी चुकून सत्य बोलतात. अर्थात् फारूख अब्दुल्ला यांचे हे बोलणे अर्धसत्य आहे. ‘पाकिस्तान आहे तोपर्यंत काश्मीरातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील आतंकवाद थांबणार नाही !’

पाकिस्तान हा जीनांनी निर्माण केला, काँग्रेसने निर्माण केला, धर्मांध मुसलमानांनी निर्माण केला, तसेच बहुतांश हिंदूंनीही निर्माण केला आहे ! हे लोढणे आपोआप दूर होणार नाही. हिंदूंनाच ते स्वत:च्या हाताने तोडून नष्ट करावे लागणार आहे. त्याविना प्रत्येक वर्षीचा १५ ऑगस्ट आनंदाने साजरा होणार नाही, त्या दिवशीची जिलेबी गोड लागणार नाही !

३. तत्कालीन अनेक हिंदु नेते यादवीला घाबरले !

कुणीही आपणावर पाकिस्तान नावाचे स्वतंत्र, सार्वभौम आणि युद्धखोर राष्ट्र निर्माण करण्याची सक्ती केली नव्हती. आम्हीच स्वत:हून तो मूर्खपणा केला. स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा महापुरुष पंजाब्यांना, आसामीयांना, बिहार्‍यांना, मराठ्यांना, केरळवासियांना अभ्यासपूर्ण रितीने आणि घसा खरवडून सांगत होता, ‘१९४२ ची quit India (सोडा भारत, छोडो भारत !) ही चळवळ split India (तोडा भारत, तोडो भारत !) मध्ये परावर्तित होईल, आताच जागे व्हा !’; पण आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ७ व्या शतकापासून प्रयत्नरत असणार्‍या महंमदी पंथाच्या अनुयायांना १९ व्या शतकापर्यंत भारताची फाळणी करायला जमले नव्हते, ते दुष्कृत्य मुसलमानांच्या वृत्तीचा, त्यांच्या वागण्याचा आणि इतिहासाचा अभ्यास नसल्याने आम्ही आमच्या हातांनी केले. अहिंसेच्या आचार्यांनी आम्हाला गुंगीत ठेवले. अपघाताने हिंदु असलेल्या ‘चाचा’ने त्याच्या मनाचा थांग लागू दिला नाही. सत्तेच्या हव्यासापोटी वृद्धत्वाकडे झुकलेल्या काँग्रेसी नेत्यांनी फाळणी स्वीकारली. अहिंसा तत्त्वामुळे हिंदूंमध्ये आलेला तथाकथित निर्भयपणा कुठे पळाला, ते कळलेसुद्धा नाही. ‘मुसलमान जर शस्त्रे परजून पाकिस्तान मागत असतील, तर हिंदूंनी ते द्यावे’, असे गांधी म्हणू लागले. अजून एक वर्ष जर ‘फाळणीसहित मिळणारे स्वातंत्र्य’ स्वीकारणे पुढे ढकलले असते आणि होणार्‍या यादवीला हिंदु समाज सिद्ध झाला असता, तर ही पाकिस्तानची डोकेदुखी तेव्हाच नष्ट झाली असती.

४. पाकिस्तानचा ‘स्वातंत्र्य’दिन ?

पाकिस्तान कुणापासून स्वतंत्र झाले ? हिंदूंपासून ? हिंदूंनी त्यांचे काय घोडे मारले होते ? एकाही मुसलमानाला आम्ही छळबळाने हिंदु करून घेतले नव्हते. एकाही हिंदु राजाने मुसलमान राजाला डोळ्यांत तापलेल्या सळ्या घालून, जीभ कापून हालहाल करून मारले नव्हते. एकाही मुसलमान स्त्रीला हिंदु सरदाराच्या अंतःपुरात (जनानखान्यात) ओढण्यात आले नव्हते. आम्हाला खिजवण्यासाठी एक दिवस आधी पाकिस्तानने आपला स्वातंत्र्यदिन घोषित केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबाहेर ढकललेला आणि पेशव्यांनी अटकेपार (अटक : आताच्या पाकिस्तानातील एक नगर, पेशव्यांनी मोगलांना तेथपर्यंत पिटाळले होते.) जाऊन बाटलीत कोंडलेला हा राक्षस आम्ही १४ ऑगस्टला मुक्त केला. आता तो आमच्या घरातच शिरला आहे. १४ ऑगस्टला आम्हीच पाकिस्तान निर्माण केले; म्हणून १५ ऑगस्टला मुक्त कंठाने ‘वन्दे मातरम् ।’ म्हणायची आम्हाला चोरी झाली आहे.

काय केले मुसलमानांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ? मुसलमान क्रांतीकारकांची ५ नावेही आम्ही सांगू शकत नाही ! हिंदुस्थानवर चालून आलेल्या रानटी आणि क्रूर मोगलांचा पराभव हिंदूंनी केला; देहलीचे मोगल सिंहासन हिंदूंनी फोडले; इंग्रजांना हिंदूंनी घालवले; दूर ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात हिंदूंनी वर्षेच्या वर्षे घालवली; अंदमानात कोलू हिंदूंनी पिसला; ‘ज्यांचे ओठ पिळले तर दूध निघेल’, अशी हिंदूंची मुले फासावर चढली; यांतील एकाही हिंदुविराने ‘पाकिस्तानसाठी आम्ही बलीदान करत आहोत’, असे म्हटलेले नाही. मग हे पाकिस्तान झाले कसे ?

५. दुसर्‍या फाळणीकडे वेगाने वाटचाल !

१५ ऑगस्ट १९४७ ला आम्ही खरेच स्वतंत्र झालो का ? स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षांनी, म्हणजे ६ डिसेंबर १९९२ या दिवशी त्रेतायुगापासून चालत आलेल्या हिंदूंच्या एका तीर्थक्षेत्राची मुक्तता केल्याकारणाने पाकिस्तानला राग का यावा ? सार्वभौम भारतातील या राममंदिरावर आपल्या हस्तकांकरवी आक्रमण करण्याची खुमखुमी अजूनही पाकिस्तानला का असावी ? एका बाजूला पाकिस्तानची रग जिरत नाही, तर दुसर्‍या बाजूला मुसलमानांची लोकसंख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १० – १२ टक्क्यांनी वाढते आहे, हे कळूनही हिंदूंना ती रोखण्याचे का सुचत नाही ? कोण कुठले देवबंदचे इस्लामी उलेमा, त्यांनी काढलेले आदेश ऐकून आमच्या कपाळावरील शीर का तडकत नाही ? या सगळ्याचे उत्तर आहे, १४ ऑगस्ट १९४७ ला केलेली हिंदूंच्या इतिहासातील सर्वांत मोठी चूक ‘आम्ही स्वत:हून केली आहे’, हे अजून हिंदूंच्या लक्षातच येत नाही.

पाकिस्तानची निर्मिती आणि अखंड भारताची फाळणी ही काही प्रशासकीय सुविधा अथवा भौगोलिक वा नैसर्गिक स्थितीमुळे झालेली नाही. आपल्या भूमीवर हिंदु राष्ट्र तोडून देऊन आतबट्टयाचा असा व्यवहार जगात हिंदूंखेरीज कुणीच केला नाही. जगातील कोणत्याही देशाच्या सीमा धर्माच्या आधारावर ठरवल्या गेल्या नाहीत, याला अपवाद केवळ भारत-पाकिस्तानचा !

१४ ऑगस्ट १९४७ पूर्वी जे गुंड होते, ते १४ ऑगस्ट या दिवशी लाहोर, कराची, रावळपिंडी, ढाका येथे राज्यकर्ते बनले. ‘एकदाची कटकट जाऊ दे’, या भावनेतून आम्ही पाकिस्तानला स्वातंत्र्य दिले. पाकिस्तान घेऊन त्यांची मागणी थांबली का ? ‘माझे ते माझेच आणि तुझे ते माझ्या बापाचे’, अशा गुंडगिरीने वागणार्‍या पाकला गेल्या ७६ वर्षांत आपण देतच राहिलो. फाळणीनंतर लगेचच ५५ कोटी रुपये (आताचे ५ सहस्र १५ कोटी ६४ लाख रुपयांहून अधिक) दिले, एक तृतीयांश काश्मीर दिला, सिंधु नदी दिली, पंचनद्यांचे (झेलम, चिनाब, रावी, सतलज, बिआस) पाणी दिले, बांगलादेशच्या युद्धात पकडलेले ९० सहस्र सैनिक महिनाभर बिअर-बिर्याणी खायला घालून परत धाडले, पाकमुळे सियाचीनवर ३० सहस्र कोटी रुपये खर्च केले, – (उणे) २० ते – (उणे) ४० सेंटिग्रेड तापमान असणार्‍या सियाचीनमध्ये लढाई न करता आतापर्यंत आपण कित्येक सैनिक गमावले, काश्मीरवर १ लाख कोटी रुपये खर्च केले; पण या बकासुराची भूक भागतच नाही.

परवाचा, तसेच पुढील प्रत्येक स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांवरील पाक पुरस्कृत आतंकवाद्यांची काळी छाया कायमची नष्ट करायची असेल, तर येथील धर्मांधांना सर्व प्रकारचे मनुष्यबळ, आर्थिक बळ, तसेच आसुरी बळ पुरवणारी, १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी जन्माला आलेली ‘पाकिस्तान’ नावाची साडेचार अक्षरे भूतलावरून कायमची पुसून टाकण्यासाठी वाटेल तो त्रास सहन करण्याची सिद्धता हिंदूंनी ठेवली पाहिजे. नियतीची तशी इच्छा आहे ! काळाचीही तशी निकड आहे !

– श्री. संजय दि. मुळ्ये, रत्नागिरी