भालचंद्र नेमाडे यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास केली जाणारे वक्तव्ये आणि त्याचे खंडण

रविवारच्या वाचकांसाठी पुनर्प्रसिद्ध करत आहोत.

कु. अन्नदा मराठे

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते. बाकीच्यांची राजवट जुलमी होती.’ इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न हा येतो, ‘पेशव्यांना राज्य दुसर्‍या सत्तेच्या हवाली करण्याचे अधिकार होते का ? कारण राज्य तर छत्रपतींचे होते आणि पेशवे सेवक होते. त्यामुळे पेशव्यांनी राज्य कुणाला देण्याचा प्रश्‍नच येत नाही.’ त्यांनी त्यातच पुढे सांगितले, ‘नानासाहेब पेशवे सत्तेवर असतांना लहान मुली मागवत असत. तशी पत्रे आहेत.’ जर असे असेल, तर ‘त्यांना छत्रपती शाहूंनी याविषयी प्रश्‍न कसा विचारला नाही ?’ जर खरच असे काही घडले असते, तर शाहू महाराजांनी नानासाहेबांना शिक्षा करून त्यांची पेशवाई कायमची रहित केली असती.

यानंतर नेमाडे म्हणाले, ‘‘काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदिरात बलात्कार होत असत. औरंगजेबाच्या २ राण्या काशीविश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला गेल्या असतांना त्यांच्यावर पुजार्‍यांकडून मंदिरात बलात्कार करण्यात आले. त्यामुळे औरंगजेबाने चिडून ते मंदिर पाडले. अशा प्रकारांसाठी पुजार्‍यांनी मंदिरामध्ये भुयार खणलेले होते.’’ यासाठीही त्यांनी कुठला संदर्भ दिलेला नाही. जरी औरंगजेबाच्या राण्या हिंदु असल्या, तरी त्यांना हिंदु धर्मानुसार वागण्याची सूट त्याने दिली होती का ? दुसरे म्हणजे एका बादशाहच्या पत्नींशी असे वर्तन करण्याचे कुणाचे धाडस होईल का ? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या वेळेला त्या राण्यांसह असलेले सैनिक काय करत होते ? त्यांची सुरक्षाव्यवस्था काय करत होती ?

– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, रत्नागिरी (९.८.२०२३)