भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल
सद्यःस्थितीत भारतात ६ कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर खोट्या ओळखपत्रांच्या आधारे भारतात रहात असूनही केवळ मतांच्या राजकारणासाठी शासनकर्ते या घुसखोरांकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन याविषयी सर्वेक्षण करायला हवे. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांमुळे आसाम, मिझोराम आणि बंगाल या राज्यांतील ८ सहस्र गावे मुसलमानबहुल झाली आहेत. या सर्व गावांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत. या घुसखोर मुसलमानांमुळे भारताच्या अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ‘लँड (भूमी) जिहाद’, ‘पॉप्युलेशन (लोकसंख्या) जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांद्वारे या घुसखोर मुसलमानांनी भारताची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणली आहे. ज्या वेळी भारत स्वतंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे. राज्यघटनेतून ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द काढण्याची वेळ आली आहे.