हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !
|
रत्नागिरी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – उच्च न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करून त्यामध्ये सामाजिक संस्थांचा समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणारा अवमान रोखण्यासाठी जनजागृती करणे अपेक्षित आहे. हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ ही मोहीम राबवत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि विक्री होत असल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन अन् पोलीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. शासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
समिती प्रत्यक्ष आणि सामाजिक माध्यमांतून प्रबोधन करत आहे. शाळा अन् महाविद्यालये यांमध्ये व्याख्याने, प्रश्नमंजुषा, हस्तपत्रके, भित्तीपत्रके आणि फ्लेक्स फलक या माध्यमांतून हा विषय समाजात रुजवत आहे अन् त्याला यशही मिळाले आहे.
रत्नागिरी
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन कांबळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रेरणा शिंदे यांनाही निवेदने देण्यात आली.
या वेळी सर्वश्री अरविंद बारस्कर, प्रवीण बोरकर, चंद्रकांत राऊळ, युवराज चिखले, तन्मय जाधव, शशिकांत जाधव, रमण पाध्ये, अशोक पाटील, चंद्रशेखर गुडेकर आणि संजय जोशी आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी प्रशासकीय परिपत्रक काढणार ! – निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना दिल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोलावण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी समितीने दिलेल्या निवेदनाविषयी सविस्तर माहिती घेतली आणि ‘यासंदर्भात आम्ही प्रशासकीय परिपत्रक काढत आहोत’, त्याची प्रत समितीला देण्यात येईल, असे सांगितले. |
चिपळूण
चिपळूण येथे नायब तहसीलदार शकील मुल्ला आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी गुहागर तालुका वारकरी संप्रदायचे खजिनदार ह.भ.प. प्रकाश महाराज निवळकर, तीवडी येथील श्री. सचिन आदवडे, मोरवणे येथील श्री. सागर साळुंखे, कात्रोळी येथील श्री. संजय जाधव, चिपळूण येथील श्री. राजेंद्र जाधव, पेढांबे येथील श्री. जयवंत शिंदे, समितीचे सर्वश्री सचिन सकपाळ, जगदीश यादव, अनिल लवेकर, दीपक सुर्वे आणि सुरेश शिंदे उपस्थित होते.
दापोली येथे नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे आणि पोलीस ठाण्याचे हवालदार चरणसिंग पवार यांना निवेदने देण्यात आली. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री राकेश गुरव, काशिनाथ भांबिड, शरद पवार, रवींद्र कोळेकर आणि दर्शन मोरे आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.