नूंह येथे पुन्हा एकदा शोभायात्रा काढणार !
महापंचायतीची घोषणा
नूंह (हरियाणा) – शहरात पुन्हा एकदा शोभायात्रा काढण्याची सिद्धता चालू असून अनेक जिल्ह्यांतील हिंदूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शोभायात्रेच्या सिद्धतेच्या दृष्टीने १३ ऑगस्टला नूंह येथे पंचायतसभा आयोजित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २८ ऑगस्टला शोभायात्रा काढण्याचे नियोजन आहे. १३ ऑगस्टला होणार्या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.
हिंसा के बाद नूंह में फिर यात्रा निकालने की जिद्द, 13 अगस्त की पंचायत को परमीशन नहीं#Haryanaviolence @Mmohit_Malhotrahttps://t.co/uHRATSZdmc
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) August 12, 2023
मुसलमानबहुल नूंह येथे ३१ जुलै २०२३ या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या ब्रजमंडळ शोभायात्रेवर मुसलमानांच्या जमावाने केलेल्या आक्रमणानंतर उसळलेल्या हिंसाचारात ६ जण ठार, तर ८८ जण घायाळ झाले होते