हिंदु युवतीवर बलात्कार करून धर्मांतर करण्यास दबाव आणणार्या तनवीर अहमद याचा जामीन रहित !
रांची (झारखंड) येथील लव्ह जिहादचे प्रकरण !
रांची (झारखंड) – ‘मॉडेलिंग’ करणार्या हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात तनवीर अहमद याला अटक करण्यात आली आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. रांची येथील सत्र न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला आहे. अहमद शहरातील कांके रस्ता क्षेत्रामध्ये ‘यश मॉडल एजन्सी’ चालवत होता. अहमदच्या विरोधात मुंबईमध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. बिहारच्या भागलपूर येथील पीडिता रांची येथे अहमदच्या संपर्कात आली होती. पुढे ती मुंबईला गेली. तेथील वर्सोवा ठाण्यात प्रविष्ट केलेली तक्रार नंतर रांची शहरात हस्तांतरित करण्यात आली.
मॉडल लव जिहाद मामला : तनवीर को बेल देने से सिविल कोर्ट का इनकार https://t.co/jZaOW3wIN3 #Model #Love #Jihad #Tanveer #bail #Court #Denial #petition #Rejected
— Lagatar News (@lagatarIN) August 10, 2023
मॉडेल असलेल्या संबंधित पीडितेने तक्रारीत म्हटले, ‘मॉडेलिंगमध्ये भविष्य करण्यासाठी मी अहमदच्या आस्थापनात काम करू लागले. तेथे दीड वर्ष काम करत असतांना मला पुष्कळ मानसिक त्रास झाला. या काळात त्याने माझ्यावर बलात्कार केला, तसेच माझ्या काढलेल्या छायाचित्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. मी मुंबईला आल्यावर त्याने मला धमकवायला आरंभ केला. मुंबईत येऊन त्याने मला मारहाणही केली. त्याला माझ्याशी विवाह करायचा आहे आणि माझे धर्मांतर करायचे आहे. माझ्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.’