राष्ट्र सुयोग्य स्थितीत रहाण्यासाठीही उपवास आवश्यक ! – पू. भिडेगुरुजी
भुयेवाडी (जिल्हा कोल्हापूर) – ज्याप्रमाणे आपण आठवड्यातील प्रत्येक वारी देवतेचा उपवास करतो त्याचप्रमाणे राष्ट्र सुयोग्य स्थितीत रहाण्यासाठीही हिंदूंनी उपवास केला पाहिजे. १५ ऑगस्टला संपूर्ण देशात-गावात भगवे झेंडे घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढली पाहिजे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते भुयेवाडी येथे धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे आणि श्री. गौतमेश तोरस्कर यांनी पू. भिडेगुरुजी यांची भेट देऊन त्यांना विशेषांक भेट दिला. या वेळी निगवे येथील श्री. आदित्य कराडे, श्री. दशरथ शिंदे, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव उपस्थित होते.