तलाठ्याची नेमणूक न झाल्यास तहसील कार्यालयास टाळे ठोकू ! – किरण लाड, अध्यक्ष, क्रांती दूध संघ
पलूस (जिल्हा सांगली) – १५ दिवसांमध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची कुंडल गावासाठी नेमणूक व्हावी, तसेच सध्याच्या महिला तलाठी यांचे स्थानांतर करावे. असे न झाल्यास तहसील कार्यालयास टाळे ठोकू, अशी चेतावणी क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड यांनी दिली. पलूस तहसील कार्यालयावर मोर्चा काढून त्यांनी तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन दिले. त्या प्रसंगी त्यांनी ही चेतावणी दिली. निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. या मोर्चात अरुण पवार, माणिक पवार, विक्रांत लाड, कुंडलिक एडके, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या.