नवाब मलिक यांना २ मासांसाठी जामीन !
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून २ मासांसाठी जामीन संमत करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘ईडी’ने मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली होती. मुनीरा प्लंबर या महिलेची ३ एकर भूमी कट रचून त्यांनी हडपल्याचा आरोप आहे. जागा भाडेततत्त्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि धाराशिवमधील शेतभूमी खरेदी केली असल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे.
नवाब मलिक को सुप्रीम कोर्ट से मिली जमानत
एनसीपी कार्यकर्ताओं ने जमानत पर मनाया जश्न #MumbaiMetro #ATVideo #Maharashtra #NCP | @ShashiTushar pic.twitter.com/3H9Q9znwzw— AajTak (@aajtak) August 11, 2023
मात्र गेल्या वर्षभरापासून मलिक न्यायालयाच्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात होते. मलिकांनी बर्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. तो वारंवार फेटाळण्यात आला होता. वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्यात आल्यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.