कात्रज (पुणे) येथील अनधिकृत ‘बीफ’ची दुकाने बंद करावीत !
‘शिवशंभू प्रतिष्ठान’ची मागणी; क्षेत्रिय कार्यालयात निवेदन सादर !
पुणे – कात्रज परिसरातील संतोषनगर भागामध्ये अनधिकृत ‘बीफ’दुकाने चालू आहेत. या दुकानांमध्ये गायीचे मांस विकले जात असून ‘गोहत्या’ केली जाते. गायीला हिंदु धर्मामध्ये देवता म्हणून पुजले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. दुकानांना कोणतीही अनुमती नसतांना ही दुकाने सर्रास चालवण्यात येतात. त्यामुळे पसिरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण दूषित होत चालले आहे. या दुकानांवर कारवाई करत ही दुकाने तातडीने बंद करण्यात यावीत, अशी मागणी ‘शिवशंभू प्रतिष्ठान’चे अध्यक्ष महेश कदम यांनी धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडे केली आहे.
यावर धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे म्हणाल्या, ‘‘संबंधित अधिकार्यांना याविषयी पहाणी करण्याच्या सूचना देऊ. अशा प्रकारे काही आढळून आल्यास कायद्यान्वये योग्य ती कारवाई करू, तसेच याविषयी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू.’’
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी ! |