अविश्वासाचा ठराव म्हणजे विरोधकांकडून स्वत:चेच वस्त्रहरण ! – मुख्यमंत्री
मुंबई – देशात विश्वास गमावलेला विरोधी पक्ष संसदेमध्ये मात्र केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडत आहे. हा ठराव म्हणजे विरोधकांकडून स्वत:चेच वस्त्रहरण आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास मागील ९ वर्षांमध्ये झाली. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला मान्यता मिळत आहे, याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही.’’