बुलढाणा येथे तरुणीला मारहाण केल्‍याप्रकरणी तिघांवर गुन्‍हा नोंद !

बुलढाणा – बारलिंगा येथील प्रियकराच्‍या घरी आलेल्‍या अमरावती येथील आधुनिक वैद्या तरुणीला मुलाच्‍या नातेवाइकांनी मारहाण करून गावात सोडून दिले. त्‍यानंतर गावातील नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस ठाण्‍यात पोचवले. प्रियकर दूरभाष उचलत नसल्‍याने त्‍या तरुणीने थेट प्रियकराच्‍या घरी येऊन घरच्‍यांना त्‍याच्‍याविषयी विचारले. त्‍या वेळी घरच्‍यांनी तिला शिवीगाळ करून मारहाण केली. ही तरुणी गावात येण्‍याआधीच प्रियकराने गावातून पोबारा केल्‍याची चर्चा गावात चालू आहे.