महाबळेश्वर, पाचगणी आणि कास येथे अनधिकृत बांधकामे नकोत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – महाबळेश्वर, पाचगणी आणि कास या परिसरांत अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, याविषयीच्या सूचना जिल्हाधिकार्यांना केल्या आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पर्यटन वाढवतांना कोकणाशी सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचा संपर्क वाढवला जाईल. या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य दिले जाणारा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा येथील विश्रामगृहात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली परिसरातील युवक नोकरीसाठी मुंबईला जातात. त्यांना येथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. ‘क्लस्टर’ शेती, बांबूची लागवड यांसारखे उपाय केले जाणार आहेत. या भागात वनौषधी मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या उपयोगासाठी प्रयत्न चालू आहेत, तसेच मुनावळे येथे ‘स्कूबा डायव्हिंग’साठी (खास उपकरण वापरून पाण्याखाली पोहणे) प्रयोग चालू आहेत.
संपादकीय भूमिकाकुठेही अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी प्रशासनाला सूचना का द्याव्या लागतात ? |