कात्रज-कोंढवा (पुणे) रस्त्यावर ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा मृत्यू !
पुणे – येथील कात्रज-कोंढवा रस्त्यावर कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ ११ वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर घायाळ झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये शाळेची बस, दुचाकी आणि ट्रकचाही समावेश आहे. ‘स्कूल बस’ला ट्रकने जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात शाळकरी मुले बचावली आहेत. २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत.