पुणे येथे लिपिकास लाच घेतांना अटक !
पुणे – वैद्यकीय देयकांतील त्रुटी न काढता धारिका पूर्ण करून देण्यासाठी अडीच सहस्र रुपयांची लाच घेतांना ‘ससून’ सर्वोपचार रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गणेश गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार महिला या शासकीय सेवक असून त्यांचे १ लाख ७ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक होते. ती रक्कम मिळण्यासाठी गायकवाड याने लाचेची मागणी केली होती. (रुग्णालय व्यवस्थापनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून लाच घेणार्यांना कठोर शिक्षा करावी ! – संपादक)