उघड्यावर लघुशंका करणार्‍यांना दंडुक्‍याचा मार !

पनवेल – बसस्‍थानकात जनजागृती करून, वारंवार तोंडी आवाहन करून सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता मोकळ्‍या जागेवर उघड्यावर लघुशंका करणार्‍या पुरुषांना दंडुक्‍याचा मार देण्‍याची सूचना आगार व्‍यवस्‍थापकांनी केली आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ आणि सुंदर बस आगारां’मधील सर्वेक्षणात पनवेल बस आगाराला ४१ गुण मिळाले. प्रतिदिन ४० सहस्र नागरिक, ३ सहस्र ३०० बस आणि २ कोटी रुपये प्रति मासाचे उत्‍पन्‍न असणार्‍या या आगाराचा पदभार सुजित डोळस यांनी घेतल्‍यानंतर अंतर्गत स्‍वच्‍छतेकडे लक्ष केंद्रीत केले. आगारामधील २७८ कर्मचारीही स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घेत आहेत.