पदपथ व्यापणार्या व्यापार्यांवर कारवाई !
डोंबिवली – पूर्वेतील बर्याच भागात व्यापारी पदपथावर साहित्य ठेवत असल्यामुळे पादचार्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रभाग अधिकार्यांकडे मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. प्रभाग अधिकार्यांनी अशा दुकानमालकांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई २ दिवसांपासून चालू केली आहे. (ही गोष्ट अधिकारी स्वतःहून का करत नाहीत ? त्यासाठी नागरिकांना तक्रार का करावी लागते ? – संपादक) कस्तुरी प्लाझा जवळील ‘अनंत स्मृती’ तळमजल्यावरील गाळ्यांमधील वाहन दुरुस्ती दुकानांवर कारवाई केल्याने वाहनकोंडी टळणार आहे.