दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी : पोलिसांकडून एकाला अटक

 ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त

दापोली – तालुक्यातील शिरखल आदिवासीवाडी येथे धाड टाकून खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणार्‍या बाळा गणपत लोंढे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रत्नागिरी आतंकवादविरोधी शाखा आणि दापोली वन विभागाने १० ऑगस्ट या दिवशी केली.

शिरखल आदिवासी वाडी येथे एक व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रत्नागिरी आतंकवादविरोधी शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील आणि दापोली वन विभागाचे वन रक्षक गणपति जळणे यांनी एकत्र येऊन ही धाड टाकली. या धाडीत खवले मांजराची खवले तस्करीच्या उद्देशाने आणि बेकायदेशीरपणे स्वत:च्या कह्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करतांना बाळा गणपत लोंढे आढळले. या वेळी त्यांच्याकडून ११.६७८ किलो ग्रॅम वजनाची खवले जप्त करण्यात आली.