तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीवरून वाद !
तिरुमला – देशातील सर्वांत श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीवरून वादाला तोंड फुटले आहे. आंध्रप्रदेशचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कुटुंबाचे कट्टर समर्थक असलेले आमदार करुणाकर रेड्डी यांना तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
Tirumala Tirupati Trust: ईसाई धर्म को मानने वाले के हाथ में सबसे अमीर मंदिर की कमान, विपक्ष ने उठाए सवाल https://t.co/twKYM3Obfd
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) August 10, 2023
करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब ख्रिस्ती धर्माचे पालन करते. आंध्रप्रदेश सरकारच्या या निर्णयावर तेलगु देसम् पक्ष, भाजप आणि इतर अनेक विरोधी पक्ष यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेलगु देसम् पक्षाचे राज्य सचिव बुची राम प्रसाद यांनी ‘हिंदु धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसे बनवता येईल ?’, असा प्रश्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांनी ‘या पदावर हिंदु धर्म मानणार्यांनाच नियुक्त केले जावे’, असे सांगितले. मंदिराच्या अध्यक्षपदाचा राजकीय वापर करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे नेते आणि माजी मुख्य सचिव कृष्ण राव यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते पूर्वी तिरुपती देवस्थान मंडळाचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात होते. (तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती करणे, हे हिंदूंना लज्जास्पद ! चर्चच्या अध्यक्षपदी हिंदु व्यक्तीची नियुक्ती झाल्याचे कधी ऐकिवात आहे का ? – संपादक)
करुणाकर रेड्डी दुसर्यांदा ट्रस्टचे अध्यक्ष होणार !
करुणाकर रेड्डी यांनी नुकतीच तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांना हे पद सोपवण्याची ही दुसरी वेळ आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे वडील व्हाय. सॅम्युअल राजशेखर रेड्डी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असतांना करुणाकर रेड्डी यांना वर्ष २००६-२००८ या कालावधीत देवस्थानचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|