लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत मध्यप्रदेशात पहिली शिक्षा !

महंमद साबिर खान याला २० वर्षांचा कारावास, तसेच ५६ सहस्र रुपयांचा दंड !

इंदूर (मध्यप्रदेश) – राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा झाल्यानंतर प्रथमच एका मुसलमानाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंदूर येथील हे प्रकरण असून महंमद साबिर खान असे या लव्ह जिहाद्याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यात ५ वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेचा अंतर्भाव आहे, तसेच त्याला ५६ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ‘मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम २०२१’च्या कलम ३/५ यांतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१. विशेष लोकाधिवक्त्या सुशीला राठौर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना सांगितले की, २० वर्षीय महंमदने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चाकूच्या धाकावर ९ सप्टेंबर २०२० या दिवशी तिच्यावर बलात्कार करून तिला इस्लाम स्वीकारण्यास बाध्य केले. हे कृत्य समाजावर विपरीत परिणाम करणारे असल्याने त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२. मंहमदने पीडितेवर बलात्कार केल्यानंतर काही दिवसांनी तो तिच्या घरी गेला आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केले. या वेळी त्याने तिची अश्‍लील छायाचित्रे काढून त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो जे सांगेल, त्या प्रकारे वागण्यासाठी तिला बाध्य केले. जर तिने तोंड उघडले, तर व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. यामुळे ती आणि तिचे कुटुंबीय आत्महत्या करण्यास बाध्य होतील, अशा प्रकारे त्याने तिला घाबरवले.

३. कालांतराने त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. काही दिवसांनी पीडितेने तिच्यावरील अत्याचारांविषयी घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आणि महंमदला अटक झाली.

संपादकीय भूमिका

देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !