हिंदुत्वनिष्ठ अनंत करमुसे यांना सुनील मिल यांच्याकडून मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ !
ठाणे, १० ऑगस्ट (वार्ता.) – येथील सुनील मिल यांनी मद्यप्राशन करून हिंदुत्वनिष्ठ अनंत करमुसे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदकेला आहे.
यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करमुसे यांनी केला आहे. मिल हे ‘घराजवळ येत सुनील मिल यांनी ‘केस मागे घे साहेबांना पुष्कळ त्रास देत आहेस’, असे म्हणत असल्याचा आरोप करमुसे यांनी केला आहे. अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण केल्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
सुनील मिल यांनी मद्यप्राशन केल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रात्रीच्या सुमारास घटनास्थळी पोलीस धावत गेले असता मिल हे शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत असल्याचे पोलिसांना दिसले. नशेत असल्यामुळे ते पडल्याने त्यांच्या डोक्याला शुरॅक लागल्याचेही पोलिसांनी सांगितले.