वातानुकूलित लोकलगाड्यांत ४ मासांत आढळले प्रतिदिन १२६ फुकटे प्रवासी !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – पश्‍चिम रेल्‍वेवरील वातानुकूलित लोकलगाडीत प्रवास करणारे कितीतरी प्रवासी तिकीट काढतच नसल्‍याचे कारवाईत लक्षात येत आहे. या गाड्यांमध्‍ये गर्दी वाढत आहे; मात्र बहुसंख्‍य फुकट प्रवास करत आहेत. गेल्‍या ४ मासांत प्रतिदिन किमान २१६ फुकटे प्रवासी पकडले गेले.

जुलै २०२३ मध्‍ये लोकलगाड्यांमधील विनातिकीट आणि अयोग्‍य तिकीटावर प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून १५ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे. एप्रिल ते जुलै २०२२ या काळात २६ सहस्रांहून अधिक प्रवाशांकडून ८७ लाख ११ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे. छुप्‍या पद्धतीने मालवाहतूक करून रेल्‍वेचा महसूल बुडवणार्‍या पावणे दोन लाख प्रवाशांकडून पावणे अकरा कोटींचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

रेल्‍वेमधील फुकट्या प्रवाशांची समस्‍या कायमस्‍वरूपी सोडवण्‍यासाठी रेल्‍वे प्रशासन कठोर कारवाई केव्‍हा करणार ?