केंद्र सरकारच्‍या अविश्‍वासाच्‍या ठरावावरील मतदानासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या दोन्‍ही गटांकडून पक्षादेश !

मुंबई – विरोधकांनी केंद्र सरकारच्‍या विरोधात आणलेल्‍या अविश्‍वासाच्‍या ठरावावर मतदान करण्‍यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या शरद पवार आणि अजित पवार या दोघांकडून स्‍वतंत्रपणे पक्षादेश काढण्‍यात आले होते. यामध्‍ये शरद पवार यांच्‍या गटाने अविश्‍वास ठरावाच्‍या बाजूने, तर अजित पवार गटाने केंद्र सरकारच्‍या समर्थनार्थ मतदान करण्‍याचा आदेश काढला आहे. लोकसभेचे अध्‍यक्ष यामधील कोणत्‍या पक्षादेशाला मान्‍यता देतात हे पहावे लागणार आहे.

‘लोकसभा अध्‍यक्षांच्‍या मान्‍यतेनुसार कुणाचा पक्षादेश वैध आहे ?’ हे ठरवला जाण्‍याची शक्‍यता आहे. ८ ऑगस्‍टपासून या प्रस्‍तावावर संसदेत चर्चा चालू आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाकडून प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांनी, तर शरद पवार गटाकडून महंमद फझल यांनी पक्षादेश काढला आहे. लोकसभेत राष्‍ट्रवादीचे ५ खासदार आहेत. त्‍यांपैकी ४ खासदार महाराष्‍ट्रातील, तर १ खासदार लक्षद्वीप येथील आहे.

संपादकीय भूमिका

ही लोकशाहीची थट्टाच नव्‍हे का ?